CM ठाकरे महाराष्ट्र आयपीएलप्रमाणं चालवत आहेत : देवेंद्र फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis targets cm uddhav thackeray over pm meeting is like a ipl remark

CM ठाकरे महाराष्ट्र आयपीएलप्रमाणं चालवत आहेत : देवेंद्र फडणवीस

मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर सडकून टीका केली होती, त्यानंतर आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंवर भाषणातून जोरदार टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या बैठकीत आयपील समजून जर बसत असतील, तर तुम्ही महाराष्ट्र चालवताय ते आयपीएलप्रमाणे मनोरंजनच करतायत, पण माझा प्रश्न आहे तुमचं मनोरंजन सुरुए पण नांदेडमध्ये अतिरिक्त उस विकत घेतला नाही म्हणून ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्या शेतकऱ्याकडे, एसटीच्या 135 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याकडे कोण पाहाणार? ज्या मराठ्यांचं आरक्षण गेलं, ज्या ओबीसीना आरक्षणापासून तुम्ही वंचित केलं यांच्याकडे कोण पाहणार? पाणी आणि वीज मिळत नाही, शेतमजूर आणि बारा बलूतेदारांकडं कोण पाहाणार? तुमचं मनोरंजन चाललंय सामान्य मानसाची होरपळ होतेय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: "ओवेसीने ओरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवला, अन् तुम्ही...''; फडणवीसांची टीका

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सकाळचा शपथविधी यशस्वी झाला नाही हे बरं झालं पण जरी यशस्वी झाला असता तर माझ्या मंत्रीमंडळात भ्रष्टाचारी मंत्री आणि अधिकारी बसले नसते, असा टोला देखील त्यांनी लगावला. तसेच वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो. नुसती फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

हेही वाचा: फडणवीसांच्या सभेला अवतरले मोदी; अस्सलिखित मराठीत दिली प्रतिक्रिया

Web Title: Devendra Fadanvis Targets Cm Uddhav Thackeray Over Pm Meeting Is Like A Ipl Remark

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top