ठाकरे सरकारमध्ये अजित पवारांच्या शब्दाला किंमतच नाही - फडणवीस

'उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत नाही, हे ऊर्जामंत्री यांनी दाखवून दिलंय'
political
politicalesakal
Summary

'उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत नाही, हे ऊर्जामंत्री यांनी दाखवून दिलंय'

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. यामुळे अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आजच्या कामकाजाला सुरुवात झाली. दरम्यान, आजच्या अधिवेशनात वीजबीलाचा मुद्दा तापला असून विरोधकांनी यावर खोचक प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असून वीज कनेक्शन बंद करावं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारला सुनावलं आहे.

वीज बिलाचा मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याने अधिवेशनाचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, वीजबिल प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात आश्वासन दिलं आहे. मात्र त्यांच्या शब्दाला काही किंमत नाही, हे ऊर्जामंत्री यांनी दाखवून दिलं आहे. ठाकरे सरकार बिल्डरांना सूट देत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्याच्या (Ajit Pawar) आश्वासनाला सरकारमध्ये काहीही किंमत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

political
अर्थसंकल्पीय अधिवेशन : विधानसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब

पुढे ते म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतरही राज्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरू आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आश्वासनाला ऊर्जा मंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. हे सरकार शेतकरी विरोधी तोकडं सरकार आहे. त्यांनी शेतकऱ्यासंदर्भात सुलतानी वसुली चालु केली आहे. मात्र भाजप (BJP) शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे. जोपर्यंत वीज तोडणी बंद होत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सभागृहात वीजबिलाचा मुद्दा तापला आहे. नाना पटोलेंनी वीजबिलाच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक झाले. तुम्हाला समर्थन देणाऱ्यांनी राजू शेट्टींनी (Raju Shetti) महावितरणचं कार्यालय जाळलं. शेतकऱ्यांच्या संदर्भात संवेदनशील भूमिका घ्या, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

political
'फडणवीस मोठे नेते', रोहित पवारांकडून 'त्या' घटनेचा निषेध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com