'फडणवीस मोठे नेते', रोहित पवारांकडून 'त्या' घटनेचा निषेध

Rohit Pawar on Devendra Fadnavis
Rohit Pawar on Devendra Fadnavis Google

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी ते पिंपरी चिंचवडमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारवर चप्पल (Slippers Thrown on Devendra Fadnavis Car) भिरकावली. या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी चप्पल भिरकावणाऱ्या व्यक्तीला सुनावले आहे.

Rohit Pawar on Devendra Fadnavis
फडणवीसांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण, त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही, असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विट करून निषेध नोंदवला आहे.

नेमकी घटना काय? -

देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनाला गेले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचा विरोध होता. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. याचवेळी फडणवीसांचा ताफा जात असताना एका व्यक्तीनं फडणवीसांच्या कारच्या दिशेनं चप्पल भिरकावली. त्यामुळे हा वाद अधिक वाढला असून चौकशी करण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस चौकशी करत असून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

फडणवीसांची प्रतिक्रिया काय? -

स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी काळे, पिवळे, निळे झेंडे दाखवतात. पण, त्यांना दाखवू द्या. एखादे चांगले काम करून श्रेय घ्या. पण, यांना काम न करता दुसऱ्यांसमोर निदर्शने करायची आहेत. अण्णा साहेब पाटलांच्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नावाच्या उद्यान समोर आंदोलन करण्याची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडली. मला यांच्या बुद्धीची कीव येते, हे दुर्दैव्य आहे, फडणवीस म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com