शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Criticizes on Shivsena over Prithviraj Chavan statement
Devendra Fadnavis Criticizes on Shivsena over Prithviraj Chavan statement

मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य गांभीर्याने घ्यावे लागेल. 2014 मध्येच सेना- काँग्रेस एकत्र येणार होते, हे गंभीर असल्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा आता खरा चेहरा उघड झाला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

फडणवीस म्हणाले, 'जर 2014 ला सुद्धा शिवसेना काँग्रेससोबत जायला तयार होती, तर ते आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे, यातून त्यांचा खरा चेहरा उघड होत आहे, विचारसरणी आणि तत्त्व अशा गोष्टीच नाही तर सत्ताच त्यांच्यासाठी सर्वोपरी आहे.

'शिवसेनेने २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता', त्यावेळी तो प्रस्ताव काँग्रेसनेच धुडकावला होता, असे चव्हाण यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यावर फडणवीसांनी टीका करताना शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

जवानाच्या लग्नाची जय्यत तयारी चालू होती, पण तो पोहोचू शकला नाही; कारण...

तत्पूर्वी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास ४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपकडून धमक्या आणि आमिषे दाखविण्यात आल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. भाजप-सेनेतील वाद पाहता या परिस्थितीत आम्ही आमची भूमिका बदलण्याचे ठरविले आणि पर्यायी सरकारबाबत विचार सुरु केला. मी यात पुढाकार घेतला, त्यानंतर चर्चा सुरु झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com