पाच वर्षे महायुतीचं स्थिर सरकार येणार; भाजपच्या गटनेतेपदी फडणवीसांची निवड

पाच वर्षे महायुतीचं स्थिर सरकार येणार; भाजपच्या गटनेतेपदी फडणवीसांची निवड

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झालीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपच्या दहा आमदारांनी अनुमोदन दिलंय. सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे-पाटील, गणेश नाईक, देवराव भोई, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, अँड आशिष शेलार आदींनी हे अनुमोदन दिलंय. या बैठकीला कोअर कमिटीच्या सदस्या म्हणून पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.  

लवकरच महायुती सत्तास्थापन करेल

विधिमंडळ नेता निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सत्तास्थापन करेल असा विश्वास वर्तवला आहे. याचसोबत, देवेद्र फडणवीस यांनी सर्व मित्रापाक्षांसोबतच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत.  

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे :  

  • १९९५ पासून कोणत्याच पक्षाला १०५ जागा मिळाल्या नाही.
  • भाजपा पक्षाला फक्त १०५ जागा मिळाल्या आहेत.
  • हे महायुतीला मिळालेला बहुमत आहे
  • आपण जनतेत महायुती म्हणून गेलो
  • लवकरच महायुतीच सरकार स्थापन होणार
  • कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचं राज्य करू असं म्हणत राहिलेली सर्व कामं करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. पुढची पाच वर्ष स्थिर सरकार राहील याचाही पुनरुच्चार फडणवीस यांनी केलाय. दरम्यान काम करत असताना सहकारी चिलखतासारखे आपल्यासोबत असल्यामुळे चेहऱ्यावर कायम हसू टिकून असतं अशी प्रतिक्रिया फडणवीस यानी दिली. 

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना करणार फोन 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उद्धव ठाकरे यांना फोन करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेनेनं सत्ता स्थापनेबाबत  प्रतिसाद दिल्यास शिवसेना आणि भाजपमध्ये बैठक होणार आहे. मात्र, शिवसेना यासाठी तयार नसल्यास मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळतेय. 

Webtitle : Devendra Fadnavis elected as the leader of Maharashtra BJP legislative party

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com