अजितदादा चक्की पिसिंग, पिसिंग; फडणवीसांचा व्हिडिओ व्हायरल (Video)

टीम-ई-सकाळ
Monday, 25 November 2019

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही नेहमीच एकमेकांचे राजकीय विरोधक राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्रित येत सत्ता स्थापन करणे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी आश्चर्यकारक आहे. त्यामुळे नेटीझन्सकडून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत आहे. 

पुणे : महाराष्ट्रात सत्तानाट्य कायम असताना सोशल मिडीयावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीसोबत युती नाही हा व्हिडिओ व्हायरल झालेला असतानाच आता अजितदादा चक्की पिसिंग, पिसिंग हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

(सौजन्य : एबीपी न्यूज)

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही नेहमीच एकमेकांचे राजकीय विरोधक राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी एकत्रित येत सत्ता स्थापन करणे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी आश्चर्यकारक आहे. त्यामुळे नेटीझन्सकडून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत आहे. 

भाजपचा डाव उधळून लावण्याची तयारी 

सध्या ट्रोल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फडणवीस हे भाषण करताना अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. यामध्ये फडणवीस हे आपलं सरकार सत्तेवर आल्यानंर अजित पवार यांना जेलमध्ये चक्की पिसायला लावणार असल्याचे जनतेला सांगत आहेत. परंतु, प्रत्यक्षात मात्र, त्याच अजित पवार यांच्यासोबत हातमिळवणी करत फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याने अजित पवारांचे बंड 

दरम्यान, फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून आमचे सर्व आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 30 तारखेला होणारी बहुमत चाचणीही यशस्वी होण्याचा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता भाजप 30 तारखेला बहुमत सिद्ध करणार की सरकार कोसळणार हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra Fadnavis old video viral on social media speak about ajit pawar