पंकजा मुंडेंच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...

सध्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
Pankaja Munde And Devendra Fadnavis News
Pankaja Munde And Devendra Fadnavis Newsesakal

मुंबई : पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज सोमवारी (ता.१३) मुंबई येथे भाजपची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी निवडणूक प्रक्रियेत पंकजा मुंडे या दिसत नाहीत. त्या नाराज आहेत का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडे मध्य प्रदेशाची जबाबदारी आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात. (Devendra Fadnavis Reaction On Pankaja Munde Inactive Participation In Election Process)

Pankaja Munde And Devendra Fadnavis News
जालन्यात भीषण अपघात; वडील अन् मुलगा जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी

तेथे आता निवडणूकही आहे. तिथला प्रभार त्या सांभाळतात. आणि आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो. तुम्ही काळजी करु नका? भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे आणि आम्ही सर्व परिवाराचे घटक आहोत, असे फडणवीस म्हणाले. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे.

Pankaja Munde And Devendra Fadnavis News
रामाच अस्तित्व न मानणारे आता रावणाला मानू लागले, इराणींचा काँग्रेसला टोला

त्यामुळे भाजपचे पाच उमेदवार विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणात आहेत. सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे. येत्या २० जून रोजी निवडणूक होत आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे दिसत नाहीत. विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळेल अशी त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांना वाटत होते. मात्र त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com