जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

राज्यातल्या विविध प्रकल्पांची कामं रखडल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटदार, अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. पाच पाच वर्षांची टाइमलाइन जगात कुठं असते का? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला.
Maharashtra CM Fadnavis Warns Officials and Contractors Finish Work in 15 Days

Maharashtra CM Fadnavis Warns Officials and Contractors Finish Work in 15 Days

Esakal

Updated on

राज्याच्या मंत्रिमंडळाची आज बैठक सुरू आहे. या बैठकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये आणखी आजारांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिलीय. तसंच राज्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या प्रकल्पांची कामं रखडल्यानं फडणवीसांनी थेट कंत्राटदारांना इशारा दिलाय. पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत असून त्यासंदर्भातही केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com