esakal | फडणवीसांनी घेतले कुलदैवताचे दर्शन; 'या' गोष्टीसाठी मागितले आशिर्वाद
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis visited Nira Narsinghpur and took his blessings today

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

फडणवीसांनी घेतले कुलदैवताचे दर्शन; 'या' गोष्टीसाठी मागितले आशिर्वाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आज थेट आपल्या कुलदैवताचे मंदिर गाठले आणि राज्याच्या विरोधीपक्षनेते पदाची नवी जबाबदारी सांभाळण्यासाठी आशिर्वाद घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद राजकीय घडामोडी नंतर हुकले. मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस मुख्यमंत्री न होता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते झाले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.०८) इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह या कुलदैवताचे आवर्जून दर्शन घेतले.

कायदे करून काही होत नाही; मानसिकता बदला : उपराष्ट्रपती

आपण दरवेळी दर्शनास येतो. इथून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आशिर्वाद मागतो. आता जी जबाबदारी आहे ती उत्तम पार पाडण्यासाठी आज आशिर्वाद मागितले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उध्दव ठाकरे आणि फडणवीस यांच्या मैत्रीला शरद पवार आणि संजय राऊत यांची मैत्री भारी पडली का? यावर हे आता उध्दव ठाकरे यांनाच विचारा असा टोला त्यांनी यावेळी लगावला. 

सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणुकीत कोरगावकरांचे बंड कोणाच्या पथ्थ्यावर?

आता तर महाविकास आघाडीची इनिंग सुरू झाली आहे. त्यांना जरा वेळ देऊ असे फडणवीस म्हणाले यावरून नव्या सरकारला कधी कोंडीत पकडायचे याचा भारतीय जनता पक्षाने विचार केलेला दिसत असल्याचे लक्षात येत आहे.

loading image
go to top