Devendra Fadnavis : "सगळ्या गोष्टी बाहेर काढेन" ; पहाटेच्या शपथविधीवरुन फडणवीसांचा इशारा!

Devendra Fadnavis 
Devendra Fadnavis 

Devendra Fadnavis : राज्याची महसूल परिषद सुरू आहे. या परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. अजित पवार आणि जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले होते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये ही पद्धत आहे, भावी मुख्यमंत्री, भावी पंतप्रधान ते सांगत असतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. 

मी माझ्या अनुभवातून शिकलो. कधीही काही होऊ शकते. कुणाला वाटलं होत का की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. मात्रे ते बनले. ज्याला ज्याला जो जो भावी वाटतो त्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असे फडणवीस म्हणाले. 

Devendra Fadnavis 
Shivsena : उद्धव ठाकरे 'त्या' चुकीमुळे येणार गोत्यात; सत्तासंघर्षाच्या प्रकरणाला कलाटणी मिळणार?

महाराष्ट्रात हळूहळू गौप्यस्फोट होत आहेत. मी कसा खरा होतो हे सर्वांना कळत आहे. मात्र तुम्हाला अर्धच समजलं आहे. हळूहळू तुम्हाला सर्व कळेल. मी सगळ्या गोष्टी बाहेर काढेन, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. 

Devendra Fadnavis 
IPL 2022 Delhi Capitals : पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स इतिहास रचणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com