''मेट्रो-3 च्या उद्घाटनाला आम्हाला बोलावले नाही तरी चालेल पण''... | Mumbai Metro | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मेट्रो-3 च्या उद्घाटनाला आम्हाला बोलावले नाही तरी चालेल पण''...

''मेट्रो-3 च्या उद्घाटनाला आम्हाला बोलावले नाही तरी चालेल पण''...

मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पुन्हा एकदा मेट्रोच्या उद्घाटनावरुन राज्यसरकारला चिमटे काढले आहेत. दरम्यान, गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबई मेट्रोच्या 2-A (Metro 2A) आणि मेट्रो 7 या मार्गिकेचे (Mumbai Metro) लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या कार्यक्रमाला राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणच देण्यात आलेले नाही. यावर टीका करताना फडणवीस यांनी राज्य सरकारचे नाव न घेता त्यांनी जरुर मेट्रोचं उद्घाटन करावं, माझ्या त्यांना शुभेच्छा असल्याचे म्हणत जनतेला माहित आहे की, दोन्ही मेट्रोचं काम आपण सुरु केले आहे, तसेच अतिशय वेगावे ते सुरु होते. मात्र, या सरकारमध्ये मेट्रोचे काम रखडले होते असेदेखील त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: 'मुख्यमंत्री साहेब इथं थोडा भेदभाव होतो, तुम्हीच काय ते खरं सांगा'

फडणवीस म्हणाले की, मेट्रोच्या उद्घाटनाला आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरु करा. मेट्रो 3 चा प्रश्न निकाली काढा. कारण मेट्रो 3 आतापर्यंत सुरु होऊ शकली असती, पण चार वर्षे सुरु होऊ शकणार नाही, असा खोचक टोलादेखील त्यांनी लगावला आहे. सरकारने श्रेय घ्यावं पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये असा सल्लादेखील त्यांनी राज्य सरकारला देत सरकारने मेट्रो तीन चा प्रकल्प सवकर सुरु करावा. ९ महिन्यात आरेमधील कारशेडचं काम पूर्ण होऊ शकते असेदेखील ते म्हणाले. गृह विभागावर नाराजी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असून, यावर भाष्य कशाला करायचे असे ते म्हणाले.

हेही वाचा: आज आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय, कारण... : मुख्यमंत्री

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भगवं तेज अनुभवायला मिळताय. मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होतोय, नविन वर्ष सुख समृद्धी, आणि आरोग्यदायी जाओ. अशा शुभेच्छा फडणवीसांनी सर्वांना दिल्या आहेत. यावळेचं वेगळेपण असं आहे की, एकीकडे श्री रामाची मिरवणूक काढत असताना, अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचं प्रत्यक्ष निर्माण वेगाने होत आहे. येत्या काळात नववर्षाचा दिवस श्री रामाच्या सानिध्यात अयोध्येत साजरा करता येईल असे ते म्हणाले.

Web Title: Devendra Fadnvis Corner State Government On Metro Opening

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top