esakal | देवेंद्रजी खूप खूप अभिनंदन : उदयनराजे

बोलून बातमी शोधा

 Devendraji Congratulations very much: Udayan Raje

आज (शनिवार) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेकजण त्यांना प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष शुभेच्छा देत आहेत.

देवेंद्रजी खूप खूप अभिनंदन : उदयनराजे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा ः मुंबईतील राजभवन येथे आज (शनिवार) सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेले महिनाभर सरकार होत नसल्याने तसेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीर केले. यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.

दरम्यान या शपथविधीनंतर राज्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. साताराचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरवरुन फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणतात देवेंद्रजी फडणवीस यांनी राजभवन येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप अभिनंदन. 

अजित पवारांनी आमच्या सोबत यायचा निर्णय घेतला ः देवेंद्र फडणवीस 

माजी खासदार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घट्टमैत्री असल्याचे नेहमी उदयनराजे सांगत असतात. उदयनराजेंनी भाजपात यावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते. परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पराभवास सामोरे जावे लागले.

लोकसभा पोटनिवडणुक आणि विधानसभा निवडणूकीनंतर उदयनराजेंनी मुबईतील वर्षा बंगला येथे जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आज (शनिवार) मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर सकाळी पावणे नऊ वाजता उदयनराजेंनी ट्‌वीटरवरुन देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

अजित पवरांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून हकालपट्टी.


 

श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी राजभवन येथे घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप खूप अभिनंदन.@Dev_Fadnavis pic.twitter.com/eH5rcIeT9l

— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 23, 2019

>