अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादीचे गटनेते असलेले अजित पवार यांनी भाजपसोबत निर्णय घेतल्याने त्यांच्यासोबत किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आम्ही शेवटपर्यंत पवारसाहेबासोबत असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पाठिशी नसताना भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात येणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. शरद पवारांनी स्वतः अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. अजित पवार यांच्यासोबत बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हेही उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवारांचे बंड 

राष्ट्रवादीचे गटनेते असलेले अजित पवार यांनी भाजपसोबत निर्णय घेतल्याने त्यांच्यासोबत किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आम्ही शेवटपर्यंत पवारसाहेबासोबत असल्याचे म्हटले आहे. तर, जयंत पाटील यांनीही याबाबत काही माहिती नव्हते असे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवारांनी केलेले हे बंड त्यांना सत्तेपर्यंत नेईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अजित पवारांनी पक्षाविरोधात बंड केल्याने त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात येईल का हा प्रश्न आहे. 

अजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP may be Expulsion Ajit Pawar for supports BJP