Accident: कार्यक्रमात हास्याची उधळण, परतीच्या वाटेवर मृत्यूची झडप; नमन कलाकाराचा जागीच मृत्यू

Ratnagiri Accident: देवरूख-रत्नागिरी मार्गावर भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका नमन कलाकाराचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
Ratnagiri Accident

Ratnagiri Accident

ESakal

Updated on

देवरूख : देवरूख-रत्नागिरी मार्गावरील निवेबुद्रुक येथे आज सकाळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मुंबईतील (मूळ रा. सावर्डे) एका नमन कलाकाराचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विघ्नेश केशव सपकाळ (वय ३५, रा. आप्पापाडा, मालाड पूर्व, मुंबई, मूळ सावर्डे, चिपळूण) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे तर जखमींमध्ये चंद्रशेखर शिवराम पांचाळ (वय ५३, रा. सायले सुतारवाडी, ता. संगमेश्वर), मंगेश महादेव पाताडे (वय ४५, रा. रत्नागिरी), नंदिनी मंगेश पाताडे (वय ४०, रा. लक्ष्मीचौक, गाडीतळ, रत्नागिरी) यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ratnagiri to Mumbai seaplane service latest news
vasai Vadghar-Medha road bridge collapsed
Lanja Mumbai Goa Highway accident
Ratnagiri ST bus accident
Marathi News Esakal
www.esakal.com