भाजपने दिली 'या' चार नेत्यांना विशेष जबाबदारी

टीम-ई-सकाळ
Sunday, 24 November 2019

महाराष्ट्रातील सत्तानाट्य हे काही थांबण्याचे नाव घेत नसतानाच भारतीय जनता पक्षाने मात्र काहीतरी वेगळी योजना आखली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर विषेश जबाबदारी सोपविली आहे. 

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्य हे काही थांबण्याचे नाव घेत नसतानाच भारतीय जनता पक्षाने मात्र काहीतरी वेगळी योजना आखली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर विषेश जबाबदारी सोपविली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्रातही भाजपकडून ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्यासाठी हे नेते प्रयत्न करणार असल्याचे आणि त्याच्यावर ही विषेश जबाबदारी देण्यात आली असाल्याचे सांगण्यात येत आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजप बहुमत चाचणी यशस्वी करणार असल्याचा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना देण्यात आला आहे.

आमदार निवासातून 11 मोबाईल फोन जप्त

बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रिय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री विनोद तावडे आदी वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. यावेळी आमदारांकडून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला. बैठकीला जवळपास 118 आमदार (भाजप आणि इतर अपक्ष) असल्याचा दावाही भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. अशातच बहुमतासाठी 144 आमदारांची गरज असताना जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाजपसोबत नाही आले तर प्लॅन 'बी' तयार असण्याच्या उद्देशाने भाजपकडून हालचाली सुरु असल्याचे समजते.

अजित पवारांच्या ट्विटनंतर आदित्य ठाकरेंनी रिट्विट केला सुप्रिया सुळेंचा 'हा' फोटो

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपकडून काँग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न केले जात असून काँग्रेस आमदारांना भाजपनेत्यांकडून फोन येत असल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार करण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस यशस्वी करण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा खुलासा चव्हाणांनी केला आहे.

सांगलीत होता अजित दादांचा मोठा गट

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून आमचे सर्व आमदार सोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, 30 तारखेला होणारी बहुमत चाचणीही यशस्वी होण्याचा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता भाजप 30 तारखेला बहुमत सिद्ध करणार की सरकार कोसळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP has given special responsibility to four leaders