
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचं समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरीपुरवठा खातं होतं. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ५ महिन्यांचा काळ उलटला तरी धनंजय मुंडे यांनी त्यांचा सरकारी बंगला अद्याप रिकामा केलेला नाही. धनंजय मुंडेंना सातपुडा हा सरकारी बंदला देण्यात आला होता. आता मंत्रिपद सोडल्यानंतरही बंगला रिकामा न केल्यानं त्यांच्यावर लागू केलेल्या दंडाची रक्कम तब्बल ४२ लाखांवर पोहोचली आहे. हा दंड माफ करण्याचा विशेषाधिकार मुख्यमंत्र्यांना असतो.