Dhananjay and Pankaja Munde : "आमचं नातं आता भावा-बहिणीचं राहिलेलं नाही" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde Pankaja Munde
Dhananjay and Pankaja Munde : "आमचं नातं आता भावा-बहिणीचं राहिलेलं नाही"

Dhananjay and Pankaja Munde : "आमचं नातं आता भावा-बहिणीचं राहिलेलं नाही"

राजकीय विश्वामध्ये भावा-भावांच्या, भावा बहिणींच्या अगदी मोजक्या जोड्या अशा आहेत की ज्या एकत्र आहेत. ज्यांच्यामध्ये वितुष्ट नाही. दोन वेगळ्या पक्षांत असूनही कायम आपलं नातं जपणारे अशी धनंजय आणि पंकजा मुंडे या भावंडांची ओळख होती. मात्र आता धनंजय मुंडे यांचं विधान याला अगदी छेद देणारं आहे.

हेही वाचा: Pankaja Munde on Modi : तरी मोदीजी मला संपवू शकत नाहीत, पंकजाताई असं का म्हणाल्या?

आमच्यामध्ये आता भावा बहिणीचं नातं राहिलेलं नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी मुंडे बोलत होते. त्याचबरोबर आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाही धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. पंकजा मुंडे भाजपामध्ये आहेत तर धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. दोघे एकमेकांवर जोरदार टीका करत असत. मात्र त्यांच्यातले काही भावनिक क्षण उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत.

हेही वाचा: BJP: पंकजा मुंडे भाजपला ठोकणार राम राम? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

काय म्हणाले आहेत धनंजय मुंडे?

आमच्यात आता भावा-बहिणीचं नातं राहिलेलं नाही. आम्ही आता राजकीय वैरी झालोय. राजकारणातून आमच्या नात्यात वैर निर्माण झालं आहे. नातेसंबंध आधी होते. पंकजा यांनी आत्मपरिक्षण करावं, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. या दोघांमध्ये वारंवार वादाच्या ठिणग्या उडत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.