
Farmers Say Stop Publicity and Provide Real Help in Dharashiv
Esakal
राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसानं धुमाकूळ घातलाय. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. धाराशीव, बीड, लातूर, जालना या जिल्ह्यांना पावसानं झोडपलंय. अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. शेती खरडून गेलीय, तर नदीकाठच्या गावांमध्ये कंबरेपर्यंत पाणी आहे. फळबागांमध्येही पाणी साचलं असून आता पिक कुजायला लागलं आहे. सरकारकडून बळीराजाला मदतीची अपेक्षा असताना नेत्यांकडून मात्र यातही पोस्टरबाजी केली जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय.