पोलिसांना केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवली जातेय : गृहमंत्री

Dilip Walse Patil on BJP
Dilip Walse Patil on BJPSakal media
Updated on

पुणे : राज्यात तपास यंत्रणांची छापेमारी होत आहे. सरकारमधील अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणाांची पोलिस यंत्रणांना आणि माध्यमांना भीती दाखवली जाते, असं मोठं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते पुणे (Pune) येथे आय़ोजित सकाळ माध्यम समुहाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

Dilip Walse Patil on BJP
गृहविभागावर मुख्यमंत्र्यांची कुठलीही नाराजी नाही : गृहमंत्री वळसे-पाटील

महाराष्ट्रात यापूर्वी अशी परिस्थिती कधीही नव्हती. आजपर्यंत देशात अनेक सरकार आली आणि गेली. पण, आज केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. नागपूरला एखाद्या पक्षाच्याविरोधात बोलणाऱ्या वकिलाला केंद्रीय यंत्रणांचे लोक अटक करतात. आपल्याला राजकीय विरोध करून थांबवता येत नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने बदनाम केलं जातंय, असा आरोप दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर केला.

आज पोलिस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा, राजकारण, माध्यमांना तपास यंत्रणांची भीती दाखवली जातेय. हे महाराष्ट्राचं राजकारण नाही. यशवंतराव चव्हाणांनी किती चांगल्या महाराष्ट्राची उभारणी केली. महाराष्ट्राच्या विधानसभेने दर्जेदार चर्चा ऐकली आहे. विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन काम केले आहे. पण, आजचं चित्र असं नाही. आज फक्त विरोधक तुमच्या विरोधी कारवाई करू असं म्हणतात. तपास यंत्रणा कारवाई करताना पोलिस सुद्धा सोबत घेऊन येतात. राज्यातील पोलिसांना विश्वासात घेत नाही. राज्यातील वातावरण बिघडविण्याचं काम सुरू आहे, असंही ते म्हणाले. राजकारणाचा दर्जा घसरला आहे. तो सुधारण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com