Dipali Sayyad: दीपाली सय्यद वेटिंगवर; शिंदे गटात प्रवेश रखडला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dipali Sayyad

Dipali Sayyad: दीपाली सय्यद वेटिंगवर; शिंदे गटात प्रवेश रखडला?

शिवसेना आणि आता सेनेतील फूटीनंतर शिंदेगटाच्या वाटेवर असलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा आज 'बाळासाहेबांची शिवसेना' गटामध्ये प्रवेश होणार होता. ठाण्यातील टेंभीनाका या ठिकाणी हा जाहीर पक्षप्रवेश होणार होता. काही महिन्यांपूर्वी जेव्हा शिवसेनेमध्ये फुट पडली आणि उद्धव ठाकरे गट विरूद्ध एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडले तेव्हा या दोघांनीही एकत्र येण्यासाठी मी प्रयत्न करेन असं अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या. पण आता त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी त्यांचा पक्षप्रवेश होणार होता याबाबतची माहिती त्यांनी स्वत: दिली होती. दरम्यान हा पक्षप्रवेश रखडला असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

दरम्यान, भाजपकडून अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दीपाली सय्यद यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध केला होता. शिंदे गटाने पक्ष प्रवेश दिल्यास भाजप- शिंदे गटातील संबंधांमध्ये तणाव निर्णाण होऊ शकतो. या भीतीने शिंदे गटातील प्रवेश लांबवला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

हेही वाचा: Deepali Sayyad यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपकडून विरोध; प्रवेशाला तारीख पे तारीख

आज तिसऱ्यांदा अभिनेत्री दीपाली सय्यद वेटिंगवर आहेत. आज त्यांचा पक्षप्रवेश होता परंतु त्याबाबत त्यांना कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. आज त्यांच्या पक्षप्रवेशाची शक्यता धूसर झाली आहे. 1 वाजून गेल्यानंतरही त्यांना कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी जाहीर केलं होतं मी पक्षात प्रवेश करणार आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या पीए यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं होतं की, अभिनेत्री दीपाली सय्यद यांना कोणतीही वेळ दिलेली नाही. त्याचबरोबर आजही पक्षप्रवेशाच्या यादीत दीपाली सय्यद यांच नाव नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांच्याबद्दल संभ्रम निर्माण होत आहे.

हेही वाचा: Deepali Sayyed: एक दिवस माझाही गट...; अंधारेंच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद यांचा सूचक इशारा