Sharad Pawar on Nilesh Lanke: "हे मी तुमच्याकडून ऐकतोय..", निलेश लंकेच्या प्रवेशाची शरद पवारांना कल्पना नाही?

Sharad Pawar on Nilesh Lanke: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आज शरद पवार यांच्या गटात पक्षप्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती, त्यावर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar on Nilesh Lanke
Sharad Pawar on Nilesh LankeEsakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे आज शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता जवळजवळ ८ ते ९ महिन्यानंतर निलेश लंके यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसला असल्याच्या चर्चा सुरू असतानाच लंके यांच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी शरद पवार यांना निलेश लंके आज शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत अशा चर्चा आहेत असा प्रश्न केला असता त्यांनी "या चर्चांना काही अर्थ नाही" असं म्हटलं आहे. तर "निलेश लंके यांच्या प्रवेशावर माहीती नाही. लंके पक्षप्रवेश करणार ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकतोय", असंही ते पुढे म्हणाले आहेत.

Sharad Pawar on Nilesh Lanke
Sharad Pawar: ईडीकडून एकाही भाजप नेत्यावर कारवाई नाही; शरद पवारांनी आकडेवारीसह सगळंच बाहेर काढलं

अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंना घातली होती साद

लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' वाजवा असं म्हणत दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांनी शरद पवार गटात परत यावं असं आवाहन केलं होतं. कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला आहे, अशा चर्चा सुरू आहेत.

Sharad Pawar on Nilesh Lanke
Sharad Pawar on Nilesh Lanke: "हे मी तुमच्याकडून ऐकतोय..", निलेश लंकेच्या प्रवेशाची शरद पवारांना कल्पना नाही?

देशातील यत्रंणांचा गैरवापर

देशातील यंत्रणेचा वापर नेत्यांचा विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात कधीही केला जात नव्हता. ईडी, सीबीआय किंवा अन्य यंत्रणांचा विरोधी नेत्यांना दाबण्यासाठी केला जातोय. यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. कर्नाटकातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पण, कोर्टाने काँग्रेसचे डीके शिवकुमार यांची निर्दोष सुटका केली. यातून स्पष्ट होतंय की, ईडीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, असं पवार म्हणाले.

महाराष्ट्रातही ईडीचा गैरवापर

महाराष्ट्रातही असा प्रकार घडत आहे. अनिल देशमुखांवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे. आता रोहित पवारांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. साखर कारखाना विकायला सरकार आणि बँकेने काढला होता. ज्याने जास्त बोली लावली त्याला कारखाना देण्यात आला. याप्रकरणात जाणूनबुजून एका सक्रीय कार्यकर्त्याला थांबवण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.

Sharad Pawar on Nilesh Lanke
Nilesh Lanke : निलेश लंकेंचा शरद पवार गटात प्रवेश होणार? आठ महिन्यात निर्णय बदलण्याची वेळ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com