काँग्रेसमध्येही उभी फूट; 'या' कारणांमुळे आमदारांत दुमत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 November 2019

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून कांग्रेस आमदारांत पाठिंबा देण्यावर दुमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अहमद पटेल हे जयपूरला जाऊन काँग्रेस आमदारांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पटेल हे आमदारांची भूमिका जाणून घेऊन हायकमांड कळविणार आहेत.

पुणे : शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून कांग्रेस आमदारांत पाठिंबा देण्यावर दुमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अहमद पटेल हे जयपूरला जाऊन काँग्रेस आमदारांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पटेल हे आमदारांची भूमिका जाणून घेऊन हायकमांडला कळविणार आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यासाठी दिलेल्या नकारानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला आमंत्रित करू शकतात. शिवसेनेकडून अजूनही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे सांगण्यात येत असताना त्यांच्याकडे बहुमत नाही. अशावेळी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळणे आवश्यक असाताना काँग्रेस आमदारांत मात्र यावर दुमत झालेले पाहायला मिळत आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी करणार सत्ता स्थापन; काँग्रेसला पदाची अपेक्षा?

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रित येऊन सरकार स्थापन करायचे झाल्यास या तीनही पक्षांच्या सदस्यांचा व्हीप काढावा लागणार आहे. विश्वासदर्शक ठारावावेळी तीनही पक्षांचे सर्व सदस्य सभागृहात उपस्थित असतील याची खबरदारी या पक्षाच्या नेत्यांना घ्यावी लागेल. अशावेळी राज्यात भाजपचे संख्याबळ सर्वाधिक असताना मात्र, भाजपच्या सदस्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. विरोधी पक्षनेता भाजपचा होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute in Congress MLAs over Congress Support shiv sena