Diwali 2022 : CM शिंदेंचं PM मोदींच्या पावलावर पाऊल; गडचिरोलीत दिवाळी साजरी करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Narendra Modi
Diwali 2022 : CM शिंदेंचं PM मोदींच्या पावलावर पाऊल; गडचिरोलीत दिवाळी साजरी करणार

Diwali 2022 : CM शिंदेंचं PM मोदींच्या पावलावर पाऊल; गडचिरोलीत दिवाळी साजरी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही गडचिरोलीमध्ये जाऊन दिवाळी साजरी करणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत, अशा चर्चा रंगत आहेत.

हेही वाचा: Bali Pratipada : वही पूजनाचा शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या पाडवा पूजा विधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीतल्या दुर्गम भागातल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्याचबरोबर भामरागडमधल्या पोलिस मदत केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानिमित्ताने भामरागडमध्ये आता कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्री होते, तसंच ते गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

हेही वाचा: CM शिंदेंच्या ठाण्यात गरीबांची लूट! 'आनंदाचा शिधा' मिळतोय 100 ऐवजी 300 रुपयांना

त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेकदा गडचिरोलीला भेट दिली आहे. त्यावेळी त्यांना नक्षलवाद्यांक़डून जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान मोदींशी एकनाथ शिंदेंची तुलना केली जात आहे. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलमध्ये जाऊन जवानांना भेटले होते. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. आता मुख्यमंत्री शिंदेही त्यांचंच अनुकरण करत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असल्याची चर्चा आहे.