Bali Pratipada : वही पूजनाचा शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या पाडवा पूजा विधी

दिवाळीतील पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त. या दिवशी लक्ष्मी व कुबेराचे पूजन करून व्यापारी लोक वहीचे पूजन करतात.
Bali Pratipada
Bali Pratipadasakal

दिवाळी हा सर्व सणांचा राजा असून याला दीपोत्सव असे सुद्धा म्हटले जाते. या दीपोत्सवाची सुरुवातच गोमातेच्या पूजनाने होते व सांगता ही बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीजेने होत असते. या दिवाळीच्या उत्सवामध्येच धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन व त्याचप्रमाणे दीपावलीतील पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा यांसारखे महत्त्वाचे सण येत असतात.

दिवाळीतील पाडवा अर्थात बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मुहूर्त. या दिवशी लक्ष्मी व कुबेराचे पूजन करून व्यापारी लोक वहीचे पूजन करतात.

Bali Pratipada
Lakshmi Pujan: माता लक्ष्मीची पूजा करताना करा 'या' चार मंत्रांचा जप, होणार धनसंपत्तीत वाढ

शुभ मुहूर्त : वही पूजनासाठी सकाळी 6:45 ते स.9:30 ही शुभ वेळ असून सकाळी 11 ते दु.12:15 व दु.4:30 ते सायं.6 या वेळीदेखील वहीपूजन करता येईल.ज्यांना सायंकाळी वही पूजन करायचे आहे अशा व्यापाऱ्यांसाठी सायं.०७:४० ते सायं.०९:१० या वेळेत वहीपूजन करता येईल.

Bali Pratipada
Diwali: फटाके फोडताहेत? 'ही' काळजी आवर्जून घ्या

बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा केली जाते. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमर होण्याचे वरदान मिळाले होते. या दिवशी त्यांची पूजा केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी लाभते. तुम्हाला माहिती आहे का राजा बळी कोण होता?

अशी एक आख्यायिका बोलली जाते की एकदा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे तीन पायरी जमीन मागितली होती. राजा बळीने पहिली पायरी ब्रह्मांड आणि दुसरी पायरी पृथ्वी दिली होती. यानंतर वामनाने जेव्हा बळीला तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारले तेव्हाबळीने त्याचे डोके पुढे केले.

Bali Pratipada
Rangoli Design: मिम्सच्या रांगोळ्या व्हायरल, पहाल तर पोट धरुन हसाल

वामनाने बळीच्या मस्तकावर पाय ठेवताच राजा बळी अधोलोकात पोहोचला. या वेळी विष्णू भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन प्रतिपदेला तुझी पूजा होईल, असा त्याला आशीर्वाद दिला. तेव्हापासून राजा बळीची बलिप्रतिपदाला पूजा केली जाते.

Bali Pratipada
Diwali 2022: या मंदिरात भक्त चिट्ठ्या लिहून मागणं घालतात, लक्ष्मी माता करते सर्व इच्छा पूर्ण

पाडवा पूजा विधी

  • या दिवशी सुरवातीला बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करावे.

  • जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी.

  • या दिवशी पक्वान्नांचे भोजन करावे.

  • बळीला नैवेद्य दाखवावा.

  • यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालावे.

  • बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करावे.

  • या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रियांनी पतीला ओवाळावे.

  • व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते.

  • व्यापरी या दिवशी नव्या वह्यांचे पूजन केलं जातं. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com