Diwali Bonus : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर २१ दिवसांनी बोनस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Bonus to employees teachers of Mumbai Municipal Corporation after 21 days after cm eknath shinde order

Diwali Bonus : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर २१ दिवसांनी बोनस

मुंबई  :  मुंबई महापालिकेचे कर्मचारी, शिक्षक आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपयांचा दिवाळी बोनस शुक्रवारी जमा झाला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या संघटनांची बैठक घेत बोनस जाहीर केला होता. परंतु तब्बल २१ दिवसांनंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला आहे. बेस्ट कामगार संघाच्या शिष्टमंडळाने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी कुलाबा येथे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांची भेट घेतली होती. यावेळी दिवाळी बोनस शुक्रवारी, २१ ऑक्टोबर रोजी कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असे आश्वासन देण्यात आले होते. यानुसार शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा झाला आहे. 

मुंबईतील अनेक कामगार संघटनांनी बोनसची वाढीव रक्कम मिळावी म्हणून आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यामध्ये महापालिकेसोबत केलेल्या करारानुसार कामगार संघटनांनी दहा टक्के वाढीने बोनसची रक्कम मागितली होती. त्यामुळे यंदा मुख्यमंत्र्यांनी २२ हजार ५०० रूपयांची रक्कम जाहीर केली. त्यानुसारच पालिका तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम घोषित करण्यात आली होती.  दिवाळीला एक दिवस उरलेला असताना पालिका कर्मचाऱ्यांना बोनसची रक्कम बॅंकेच्या खात्यात जमा करण्यात आली. त्यामुळे दिवाळीचा सण येऊनही ही रक्कम उशिरा मिळाल्याने कामगार वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.