तुम्ही वाहन चालवतायं का? मग ‘हा’ नियम नक्कीच वाचा, अपघात होणार नाही; अपघाती मृत्यूची संख्या चिंताजनक

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महामार्गांचे जाळे पसरले असून चकाचक रस्त्यांमुळे वाहनांचा वेग दुप्पट झाला आहे. दुसरीकडे एका चालकांनी सलग आठ तासापेक्षा अधिक वेळ वाहन चालवू नये, चार तासानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यावा, असे वाहतूक नियम आहेत.
road accident
road accidentsakal

सोलापूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महामार्गांचे जाळे पसरले असून चकाचक रस्त्यांमुळे वाहनांचा वेग दुप्पट झाला आहे. दुसरीकडे एका चालकांनी सलग आठ तासापेक्षा अधिक वेळ वाहन चालवू नये, चार तासानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यावा, असे वाहतूक नियम आहेत. परंतु, चालकांकडून त्याचे पालन होत नाही अन्‌ संबंधित यंत्रणा देखील चालकांना काही विचारत नाही. जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यात राज्यात तब्बल साडेपाच हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२२ या वर्षी राज्यात १३ हजार ५९२ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर २१ हजार ६२२ जण गंभीर जखमी झाले. चिंतेची बाब म्हणजे अपघाती मृतांमध्ये १८ ते २५ वयोगटातील अडीच हजार, तर २५ ते ३५ वयोगटातील तीन हजार ८९८ जणांचा समावेश होता. विशेष म्हणजे समोरासमोर, मागून व बाजूनी टक्कर होऊन सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दरम्यान, अपघात कमी करण्यासाठी ई-चालान प्रणाली आली.

महामार्ग व वाहतूक शाखेचे स्थानिक पोलिस आणि आरटीओकडून दंडात्मक कारवाया करूनही अपघात कमी होण्याऐवजी वाढले आहेत, हे विशेष. अनेकदा चिरमिरी घेऊन बेशिस्त वाहनांना सोडले जाते ही वस्तुस्थिती आहे. समृद्धी महामार्ग असो वा यापूर्वीच्या मोठ्या अपघातानंतरही ठोस उपाययोजना होऊ शकल्या नाहीत, हे दुर्दैवच. मागील चार महिन्यात एकाच अपघातात एकावेळी चारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे अनेकदा घडले आहे. त्यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत रस्ता सुरक्षा समित्या कागदावरून बाहेर येणे काळाची गरज मानली जात आहे.

नियमांचे पालन केल्यास अपघात होणार नाहीत

प्रत्येक चालकांनी दिवसा आठ तासापेक्षा जास्त वेळ वाहन चालवू नये, असा नियम आहे. वाहनांची वेगमर्यादा देखील निश्चित केलेली आहे. पण, दंडात्मक कारवाई व प्रबोधन करूनही अनेकजण त्या नियमांचे पालन करीत नाहीत. प्रत्येकांनी वेगमर्यादा पाळली, आठ तासच वाहन चालवले व सिटबेल्ट, हेल्मेट घातले, मद्यपान न करता वाहन चालवले, तर निश्चितपणे अपघात कमी होतील.

- जितेंद्र पाटील, अप्पर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र

प्रवासी वाहनांमधील अग्निशमन यंत्रे नावालाच

राज्यातील खासगी प्रवासी वाहनांची संख्या अंदाजे १७ लाखांपर्यंत आहे. त्यात १५ वर्षांवरील व अनफिट वाहने देखील लक्षणीय आहेत. दुसरीकडे स्कूल बस, ॲटोरिक्षा, परिवहन महामंडळाच्या बस देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. बहुतेक प्रवासी वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रे नाहीत. तर अनेकांना ते यंत्र चालवायचे कसे हेच माहिती नाही. काहींनी कारवाईच्या भीतीपोटी ती यंत्रे ठेवली आहेत, तर पासिंगपुरती ठेवलेली यंत्रे आता बऱ्याच वाहनांमध्ये दिसत नाहीत. अनेकदा संबंधित यंत्रणांकडून त्या वाहनांची तपासणी होते, पण दंड घेऊन सोडले जाते, अशीही वस्तुस्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com