शाळा बंद करू नका, मेस्टाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Schools closed
शाळा बंद करू नका, मेस्टाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शाळा बंद करू नका, मेस्टाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई - राज्यातील गोरगरीब आणि उपेक्षित घटकातील मुलांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात मोबाईल (Mobile) आणि ऑनलाईन शिक्षणासाठीची (Online Education) साधने उपलब्ध नाहीत. शिवाय सध्या सुरू असलेली कोरोनाची तिसरी लाटही (Corona Third Wave) लहान मुलांवर (Child) फार प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आल्याने राज्यातील शाळा बंद (School Close) करू नका, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) (Mesta) केली आहे. यासाठी मेस्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना पत्र लिहून शाळा बंद करू नये, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा: मुंबईत वेगाने पसरलेली तिसरी लाट त्सुनामी सारखीच !

ऑनलाईन शिक्षण हे मागील दीड वर्षांत लाखो मुलांना मिळालेले नाही. त्यासाठी सरकारचे कोणतेही धोरण नसल्याने या शिक्षणासाठी योग्य अशी तरतूद केली जात नाही. शिवाय ऑनलाईन शिक्षणासोबतच, परीक्षांचे वेगवेगळे निकष यामुळे शालेय शिक्षणाचे प्रचंड नुकसान होत आहे. मुख्यमंञ्यानी २३ ऑक्टोबरला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे खासगी शाळांची डबघाईला आलेली परिस्थिती सुधारली. शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांचे रखडलेले पगार, इमारत भाडे, वीज, पाणी बिल हे खर्च भागविले जाऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत कोरोनामुळे पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास शाळांचेदेखील आर्थिक गणित कोलमडणार आहे, असे मेस्टाचे संस्थापक संचालक संजय तायडे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top