डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! सुसाईड नोटवरील अक्षर कोणाचे? ७ महिने होऊनही प्रश्न अनुत्तरीतच; संशयित आरोपीचा दोषमुक्तीचा अर्ज; पोलिसांनी मागविले ‘या’ ७ जणांचे ५ महिन्यांचे ‘CDR’

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला १८ नोव्हेंबरला सात महिने पूर्ण होतील. अजूनही डॉ. शिरीष यांच्या खिशातील सुसाईड नोटवरील अक्षर कोणाचे? याचे ठोस उत्तर मिळालेले नाही. वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल अप्राप्त आहे. संशयित मनीषा मुसळे मानेंनी आपण निर्दोष असल्याचे सांगत वकिलामार्फत दोषमुक्तीचा अर्ज केला आहे.
Dr. Valsangkar’s suicide case
Dr. Valsangkar’s suicide caseSakal solapur
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला १८ नोव्हेंबरला सात महिने पूर्ण होतील. अजूनही डॉ. शिरीष यांच्या खिशातील सुसाईड नोटवरील अक्षर कोणाचे?, याचे ठोस उत्तर मिळालेले नाही. वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेंनी आपण निर्दोष असल्याचे सांगत वकिलामार्फत दोषमुक्तीचा अर्ज केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वकिलांनी सात जणांचे पाच महिन्यांचे सीडीआर व टॉवर लोकेशन जतन करून ठेवावे किंवा न्यायालयात सादर करावे, असा अर्ज न्यायालयाकडे केला आहे. त्यावर २१ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

डॉ. शिरीष यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा या डॉक्टरांच्या रुग्णालयात २००८ पासून प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यांनी अधिकार व पगार कापल्याने स्वत:च्या मुलांना मारुन मी देखील रुग्णालयासमोर पेटवून घेऊन आत्महत्या करेन, असा ई-मेल डॉक्टरांना केला होता. त्या पत्रामुळे नैराश्यातून डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केली, अशी फिर्याद डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलिसांत दिली. तत्पूर्वी, डॉक्टरांच्या पॅन्टच्या खिशामध्ये सुसाईड नोट मिळाली होती.

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात ७२० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात मयत डॉ. शिरीष यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे चार-पाच दिवसांचा ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स रिपोर्ट) देखील होता. मात्र, मनीषाने न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज करीत जे लोक मृत डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सतत संपर्कात होते, अशा सात जणांचे १ डिसेंबर २०२४ ते २० एप्रिल २०२५ या काळातील ‘सीडीआर’ व टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करण्याची मागणी केली. त्यातून डॉक्टरांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर येईल, असा विश्वास मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांना आहे.

सध्याच्या तपास अधिकाऱ्यांचे पत्र असे...

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या संदर्भात सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी पोलिस उपायुक्त (परिमंडळ) यांना पत्र पाठविले आहे. डॉ. शिरीष, डॉ. अश्विन, डॉ. शोनाली, डॉ. उमा, नेहा फडके व अन्य दोघे, अशा सात जणांच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर, टॉवर लोकेशन, एसडीआर, आयएमईआय, आयपीडीआर, सीएएफ व एसएएफ याची माहिती त्यांनी मागितली आहे. त्या माहितीचा कोणताही गैरवापर होणार नाही, याची हमीदेखील त्यांनी दिली आहे. ही माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com