राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे ‘जनआरोग्य’चे लाभार्थी वाढले! पण, रुग्णालयांमधील खाटा २५ टक्केच राखीव

योजनेच्या रुग्णालयांमधील राखीव खाटांचे प्रमाण २५ टक्केच आहे. योजनेत अक्कलकोट तालुक्यातील एकही रुग्णालय नाही. तसेच माढा करमाळा, मोहोळ तालुक्यातील रुग्णांनादेखील योजनेचा लाभ मिळणे कठीण झाले आहे.
Mantralay
Mantralayesakal

सोलापूर : महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना एकत्रित करून आता सर्वांनाच पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे लाभार्थींची संख्या दहापटीने वाढली. मात्र, योजनेच्या रुग्णालयांमधील राखीव खाटांचे प्रमाण २५ टक्केच आहे. योजनेत अक्कलकोट तालुक्यातील एकही रुग्णालय नाही. आमदार सचिन कल्याणशेट्टी त्यावर काय उपाय काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच माढा करमाळा, मोहोळ तालुक्यातील रुग्णांनादेखील योजनेचा लाभ मिळणे कठीण झाले आहे.

रेशनकार्ड असो किंवा नसो, केवळ रहिवासी दाखल्यावरून आता सर्वांनाच विशेषत: शासकीय कर्मचाऱ्यांना देखील नवीन निर्णयानुसार जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यात परराज्यातून महाराष्ट्रात आलेले कामगार देखील योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. त्यामुळे लाभार्थी कुटुंबांची संख्या वाढली आहे. निर्णय झाला, लाभार्थी वाढले, मात्र योजनेचे सतराशे कोटींचे बजेट, एक हजार रूग्णालय अजूनही वाढलेले नाहीत. दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळणार असल्याने योजनेतील रुग्णालयात आता सर्वसामान्यांना बेड्‌स मिळतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्या निर्णयानुसार योजनेची व्याप्ती वाढली, मात्र रुग्णालयातील खाटा, बजेट व रुग्णालये कधी वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माढा, करमाळा, मोहोळ तालुक्यात एकच रुग्णालय

जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांवर असून परराज्यातील कामगार देखील मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात आहेत. तरीदेखील जनआरोग्य योजनेअंतर्गत केवळ ५१ रुग्णालयच आहेत. सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब म्हणजे अक्कलकोट तालुक्यात योजनेचे एकही रूग्णालय नाही. दुसरीकडे करमाळा व माढा तालुक्यात प्रत्येकी एकच रुग्णालय आहे. करमाळ्यात केवळ बालरुग्णालय असून त्याठिकाणी दुसरे सुपरस्पेशालिटी रुग्णालय नाही. मोहोळ तालुक्यात केवळ शासकीय ग्रामीण रुग्णालयच आहे. या तालुक्यात एकही खासगी रुग्णालय नाही.

सत्ताधारी चार आमदारांच्या प्रयत्नांकडे लक्ष

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी थेट संबंध आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचेही उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत तर मोहोळचे आमदार यशवंत माने यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मैत्रीचे संबंध आहेत. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. या चौघांकडून त्यांच्या तालुक्यातील सर्वसामान्यांना मोठी अपेक्षा आहे. त्यांच्या प्रयत्नातून ‘जनआरोग्य’चे रुग्णालय वाढतील, असाही त्यांना विश्वास आहे.

‘जनआरोग्य’ची जिल्ह्यातील स्थिती

  • अंदाजे लाभार्थी कुटुंब

  • १० लाख

  • एकूण रुग्णालये

  • ५१

  • योजनेअंतर्गत आजार

  • १३५६

  • उपचारावरील मदत

  • ५,०००००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com