Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

मॉन्सून यंदा २६ मे पर्यंत केरळात दाखल होणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Monsoon

Monsoon

sakal

Updated on

पुणे - एकीकडे ‘एल-निनो’च्या सावटामुळे यंदाच्या मॉन्सूनविषयी चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे उष्णतेच्या वाढलेल्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत, अशातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच अर्थातच मॉन्सून यंदा २६ मे पर्यंत केरळात दाखल होणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनचे केरळातील आगमन हे देशातील पावसाळ्याच्या अधिकृत सुरुवातीचे संकेत मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com