wedding
weddingesakal

धूमधडाक्यात विवाहांमुळे अर्थकारण बदलणार! 15 नोव्हेंबरनंतर सुरूवात

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : जगाला कोरोना संकटामुळे दीड वर्षापासून आर्थिकदुष्ट्या हतबल करून सोडले. कोरोनाची दुसरी लाट (corona second wave) ओसरली आहे. त्यामुळे यंदा विवाह सोहळे (wedding ceremony) मोठ्या थाटामाटात पार पडणार आहेत. यंदा १५ नोव्हेंबरच्या तुलसी विवाहनंतर जुलैपर्यंत विवाहासाठी मुहूर्त आहेत.

यंदा ६२ विवाह मुहूर्त

शासनाने विवाह सोहळ्याला परवनगी दिल्यामुळे बँडबाजा, हॉल, डीजे आणि केटरिंग व्यावसायिकांचे अर्थकारण बदलणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमावरील बंदी उठल्याने यंदा वऱ्हाडी मंडळींना डीजेच्या तालावर नाचण्याची संधी मिळणार आहे. दीड-दोन वर्षात कोरोना कालावधीत विवाह सोहळे झाले. मात्र वऱ्हाडी मंडळींची संख्या मर्यादित होती. त्यामुळे विवाह सोहळे मोठ्या थाटात साजरे झाले नाहीत. अनेकांनी विवाह पुढे ढकलले. यामुळे कर्ज काढून सजावट केलेले सभागृह आणि केटरिंग व्यवसाय अडचणीत आले होते. यंदा मात्र या व्यवसायाला पूर्वपदावर येण्याची संधी मिळणार आहे. याचे कारण यंदा ६२ विवाह मुहूर्त आहेत. ज्यांची सोयरिक जुळली आहे. त्यांची बुकिंगसाठी लगबग सुरू आहे.

wedding
...तर मी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार; नवाब मलिकांचे 'चॅलेंज'!

दीड वर्ष मोठा फटका

दीड वर्षात विवाह सोहळ्यांना बंधने असल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर आर्थिक गणित कोलमडले. विशेष म्हणजे ज्या वधू-वरांकडील मंडळीनी लग्नासाठी हॉल बुकिंग केले होते. त्यांनाही ऐनवेळी बुकिंग रद्द करावे लागले होते. आता मात्र विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीबाबत फारशी बंधने नाहीत. मात्र कोरोनाचे नियम पाळून विवाह होणार आहेत. सोहळ्यात केटरिंग व्यवसाय तेजीत राहील.

यंदा डीजेवर ठेका

डीजेची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. डीजेच्या तालावर वऱ्हाडी मंडळी नाचत वरात काढत असतात. आता या डीजेच्या तालावर नाचण्याची संधी पुन्हा एकदा येणार आहे. एकूणच मोठ्या आर्थिक उलाढालीवर अवंलबून असलेला हा विवाह सोहळा यंदा थाटामाटात साजरा होत असल्याने वदू-वर मंडळींबरोबरच व्यावसायिक मंडळींनाही पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार आहेत.

wedding
गोपनीय माहिती लीक; Navy कमांडरसह चौघांना CBI कडून अटक

कोरोनाच्या दीड वर्षात अनेकांनी हॉल बुकिंग रद्द केले. त्यामुळे विवाह मंगल कार्यालयाच्या मालकांना आर्थिकदुष्ट्या अनेक अडचणी आल्या. शासनाने परवनगी दिल्यामुळे विवाहांचे बुकिंग सुरू होईल. विवाह समारंभावर अवंलबून असलेल्या घटकांना दिलासा मिळणार आहे. -सतीश देशमाने (संचालक, रामसन्स एम्पायर, पिंपळगाव बसवंत)

कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळे मर्यादित साजरे झाल्याने बँडबाजा पथकांना व्यवसाय करता आला नाही. त्यामुळे अनेक वादकांना रोजीरोटीसाठी मजुरी करावी लागली. आता विवाह सोहळे धूमधडाक्यात होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी.

-रज्जाक शेख (जिल्हाध्यक्ष, बँडमालक संघटना, नाशिक)

कोरोनाच्या दीड वर्षात अनेकांनी हॉल बुकिंग रद्द केले. त्यामुळे विवाह मंगल कार्यालयाच्या मालकांना आर्थिकदुष्ट्या अनेक अडचणी आल्या. शासनाने परवनगी दिल्यामुळे विवाहांचे बुकिंग सुरू होईल. विवाह समारंभावर अवंलबून असलेल्या घटकांना दिलासा मिळणार आहे.

-सतीश देशमाने (संचालक, रामसन्स एम्पायर, पिंपळगाव बसवंत)

कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळे मर्यादित साजरे झाल्याने बँडबाजा पथकांना व्यवसाय करता आला नाही. त्यामुळे अनेक वादकांना रोजीरोटीसाठी मजुरी करावी लागली. आता विवाह सोहळे धूमधडाक्यात होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी.

-रज्जाक शेख (जिल्हाध्यक्ष, बँडमालक संघटना, नाशिक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com