महाराष्ट्र शिक्षणात प्रगता कसा?, प्रशिक्षण फलनिष्पत्तीअभावी डायटचे वेतन रखडले

education and training institutes did not work in amravati
education and training institutes did not work in amravati
Updated on

अमरावती : संपूर्ण देशात शैक्षणिकदृष्ट्या प्रगत ठरलेल्या विद्यापरिषद या शिखर संस्थेने आपल्याच जिल्हास्तरीय कार्यालयांना आपण दोन वर्षांत केलेल्या कामाची फलनिष्पत्ती काय? व २४ तासांच्या आत त्यावर अभिप्राय द्या, असे पत्र पाठवून स्वतःच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. राज्य ते शाळा यादरम्यान सेतू म्हणून कार्य करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी (डायट) कामेच केली नाही, तर मग महाराष्ट्र गुणवत्तेत असरदार कसा? नवीन आर्थिक वर्षात प्रशिक्षण संस्थेच्या वेतनाचा प्रश्न न सुटल्यामुळे सध्या गुणवत्तेत असर मात्र प्रशिक्षण बेअसर, असा वाद निर्माण होत आहे.

गत एप्रिल महिन्यापासून डायटमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला. निवेदन व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जेमतेम एप्रिल ते ऑगस्ट वेतन कसेबसे निघाले. मात्र, सप्टेंबरपासून अद्यापही वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांनी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला असता वित्त विभागाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या उपयोगितावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल विद्यापरीषदेमार्फत मागितला असल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्र प्रगत कसा?
कार्यक्षमता प्रतवारी दर्शक (पीजीआय), असर अहवाल, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण, निष्ठा प्रशिक्षण जर जिल्हा संस्थेने घेतली नाही तर महाराष्ट्र शिक्षणात अव्वल कसा? विद्या परिषदेने सर्वांना निष्ठेचे धडे दिले. डायटमध्ये अधिकारी वर्गासोबत वर्ग ३ व ४ चे कर्मचारी काम करतात मग त्यांचे वेतन का रोखले, ही कसली निष्ठा? असा प्रतिप्रश्न आता येथील कर्मचारी विचारत आहेत.

कुटुंबासहित उपोषणाचा इशारा - 
कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत नागपूर येथील कार्यरत वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी आता पैसा शिल्लक नसल्याने उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदन संबंधित प्राचार्यांना दिले. येत्या आठवड्यात वेतन न झाल्यास कुटुंबातील मुलाबाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले. नागपूरसह राज्यातील कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

...तर समायोजन -
कोरोना काळात महामारीमुळे प्राथमिक शाळा अद्यापही बंद आहेत. मात्र, शालेय सर्वच उपक्रम सुरू आहेत. प्रशिक्षण, उपक्रम, नवोपक्रम आदी सर्वांच्या उद्घाटनाला शिक्षणमंत्री, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, संचालक उपस्थित राहतात. हे सर्वच  राज्याची कामे केंद्राला दाखवितात. जर आम्ही कामे करत नसू तर आमचे इतरत्र समायोजन करावे, अशी मागणी डायटमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com