विमानातील ऑम्लेटमध्ये अंड्याची टरफले; राष्ट्रवादीच्या खासदाराची मंत्र्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

दिल्लीला जाताना विमान प्रवासात मागविलेल्या ऑम्लेटमध्ये अंड्याची टरफले सापडण्याची आणि उर्वरित खाद्यपदार्थांचा दर्जाही निकृष्ट असल्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. ट्‌विटरद्वारे त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला.

पुणे : दिल्लीला जाताना विमान प्रवासात मागविलेल्या ऑम्लेटमध्ये अंड्याची टरफले सापडण्याची आणि उर्वरित खाद्यपदार्थांचा दर्जाही निकृष्ट असल्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. ट्‌विटरद्वारे त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. 

दिल्लीमध्ये बैठकीसाठी चव्हाण पुण्याहून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने नुकत्याच गेल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी ऑम्लेट ऑर्डर केली. त्यात अंड्याची टरफले सापडली. तसेच सोबत आलेल्या बटाट्याचे आणि उकडलेल्या भाज्यांचे खाद्यपदार्थही निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी एअर होस्टेसकडे या बाबत तक्रार केली.

 

तक्रार पुस्तिका मागितल्यावर सुरवातीला तिने नकार दिला. परंतु, विमान मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर चव्हाण यांना तक्रार करण्यासाठीचा फॉर्म देण्यात आला. त्यात त्यांनी तक्रार नोंदविली. या बाबत चव्हाण म्हणाल्या, "एअर इंडियाच्या विमानात निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ मिळणे, ही गंभीर बाब आहे. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबत कारवाई केली पाहिजे, यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Egg truffle found in omelette MP Vandana Chavan complains to Minister