पिकअप,रिक्षा व ट्रकच्या तिहेरी अपघातात आठ जण ठार; लहान मुलांचाही समावेश

accident
accidentsakal

डिंगोरे गावच्या हद्दीत ,मृतांमध्ये चार वर्षाचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीचा समावेश. डिंगोरे ता.जुन्नर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर डिंगोरे पिंपळगाव जोगा दरम्यान पिकअप,रिक्षा व ट्रक यांच्या तिहेरी अपघातात रविवारी रात्री आठ जण ठार झाले असून मृतांमध्ये चार वर्षाचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीचा समावेश असल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली आहे.

accident
Accidet News: खड्ड्याने घेतला आणखी एक बळी; दोन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

या अपघातातील ओळख पटलेल्या पीकअप मधील ठार व्यक्ती मध्ये गणेश मस्करे वय.३० , पत्नी कोमल मस्करे वय.२५,मुलगा हर्षद मस्करे वय.४,मुलगी काव्या मास्करे वय .६ सर्व रा. मढ.ता.जुन्नर, जि. पुणे तर अमोल मुकुंदा ठोखे रा.जालना व रिक्षा मधील मयत रिक्षा चालक नरेश नामदेव दिवटे वय ६६ रा.पेडे परशुराम ता.चिपळूण जि.रत्नागिरी व इतर दोन अज्ञात इसम नाव पत्ता समजला नाही.

याबाबत ओतूर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार ता.१७ रोजी रात्री १०.३० वाजे दरम्यान भाजी पाला घेऊन पीक अप नंबर एम.एच.२४ .एच.जी.१९४०.ही ओतूर बाजूकडून कल्याण बाजूकडे जात असताना कल्याण बाजूकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा नंबर एम.एच.०३. बी . वाय.९०२३.यांच्यात डिंगोरे व पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण महामार्गावर असणारे पेट्रोलपंपा समोर रिक्षाला पिकअप ची धडक बसली.

accident
Nagar-Kalyan Highway Accident : नगर-कल्याण हायवेवर ट्रकने दोन वाहनांना उडवलं; अपघातात एकाच कुंटुंबातील चौघांसह ८ जण जागीच ठार

यात रिक्षा मधील तीन जण ठार झाले. ही धडक होऊन झालेल्या अपघातात नंतर पिकअप ची कल्याण बाजूकडून येणाऱ्या ट्रक नंबर एम.एच.१६.डी.सी.११६० यास धडक बसून अपघात होऊन या अपघातात पिकअप मधील ५ जण जागीच ठार झाले.सदर अपघात झाल्याचे समजताच ओतूर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकांने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमींना स्थानिक ग्रामस्थ यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.यावेळी पोलीस पथकाने महामार्गावरील व्हावे अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.पुढील तपास ओतूर पोलीस करत आहे.

accident
Ulhasnagar Accident News : मद्यधुंद कारचालकाचा प्रताप, सात वाहनांना उडवलं; तिघांचा जागीच मृत्यू, ३ गंभीर जखमी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com