राज्यातील आठ मंदिरांचे केले जाणार संवर्धन; एकवीरा देवीच्या मंदिराचा समावेश

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पहिल्या टप्प्यात राज्यातील आठ मंदिरांचे संवर्धन केले जाणार आहे.
Ekvira Temple
Ekvira Templesakal

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) (MSRDC) पहिल्या टप्प्यात राज्यातील आठ मंदिरांचे (Temple) संवर्धन (Promotion) केले जाणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कुलैदव असलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ले येथील एकवीरा देवीचे मंदिर (Ekvira Devi Temple) व लेणीचा समावेश आहे. (Eight Temples in the State will be Conserved Ekvira Devi Temple Involve)

राज्यातील प्राचीन मंदिरे, लेण्या, गडकिल्ले यांच्या संवर्धनातून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी त्यांचा जीर्णोद्धार व संवर्धन करण्यासाठी अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या कामासाठी ‘अंमलबजावणी संस्था’ म्हणून ‘एमएसआरडीसी’ची नियुक्ती केली आहे. प्राधान्याने कोणती कामे हाती घ्यावीत, हे ठरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार पहिल्या टप्प्यात आठ मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.

Ekvira Temple
संभाजीराजेंचा सरकारला अल्टिमेटम! ५ जूनपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा...

एमएसआरडीसीने यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये एकवीरा देवीच्या मंदिर व लेणीचा समावेश आहे. महाराष्ट्र हे जसे गडकिल्ल्यांसाठी ओळखले जाते, तसेच संतांची भूमी म्हणून ही ओळखले जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत. तसेच आळंदी, पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे, अष्टविनायक, त्याचबरोबरच कुलस्वामिनी तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुकामाता व सप्तश्रृंगी ही साडेतीन शक्तिपीठे राज्यात आहेत. त्यांचे संवर्धन या माध्यमातून करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील मंदिरे

  • एकवीरा देवी, कार्ले, ता. मावळ (जि. पुणे)

  • धृतपावेश्‍वर मंदिर, ता. राजापूर (जि. रत्नागिरी)

  • कोपेश्‍वर, ता. शिरोळ (जि. कोल्हापूर)

  • गोंधेश्‍वर, ता. सिन्नर (जि. नाशिक)

  • खंडोबा, ता. सातारा (जि. सातारा)

  • भगवान पुरुषोत्तम, ता. माजलगाव (जि. बीड)

  • आनंदेश्‍वर, ता. दर्यापूर (जि. अमरावती)

  • शिवमंदिर, मार्कड (जि. गडचिरोली)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com