एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिनी खडसेंच्या गाडीवर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिनी खडसेंच्या गाडीवर हल्ला

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिनी खडसेंच्या गाडीवर हल्ला

जळगाव : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या तथा जिल्हा सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. चांगदेव येथून एका कार्यक्रमातून घरी येत असताना सूतगिरणी रस्त्यावर अज्ञातांनी हल्ला. रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडील आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. रोहिनी खडसे यांच्या घरी पोलिस पोहचले आहेत. तेथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

हेही वाचा: हातपाय नसलेला चालवतो जुगाड गाडी; आनंद महिंद्रांनी दिली जॉबची ऑफर

समोरची काच फेकण्यात आल्याने रोहिणी खडसे थोडक्यात वाचल्या आहेत. राजकीय डावपेचांतूनच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासून शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील व खडसे यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

याबाबत आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ट्विट केलंय. रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा: मतदानाचा हक्क हिरावला जातोय; 12 निलंबित आमदारांचं राज्यपालांना पत्र

रोहिणी खडसे-खेलवलकर चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी, मुक्ताईनगर येथे येत होत्या. त्यावेळी सुतगिरणी जवळ अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना दुखापत झाली नसून त्यांच्या काडीवर रॅाडने काचा फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिस घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा बॅंकेच्या विद्यामान संचालिका आहेत.

Web Title: Eknath Khadse Daughter Rohini Khadse Car Attacked

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top