भाजपचा रडीचा डाव; चंद्रकांत पाटलांवर महाविकास आघाडीचा पलटवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्याला महाविकास आघाडीने प्रत्युत्तर दिले असून, भाजपचा हा रडीचा डाव असल्याची टीका केली आहे. 

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्याला महाविकास आघाडीने प्रत्युत्तर दिले असून, भाजपचा हा रडीचा डाव असल्याची टीका केली आहे. 

चंद्रकांत पाटील यांचं महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज'

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
महाविकास आघाडीकडून आज विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या नावाची घोषणा झाली. या घोषणेनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधीमंडळाबाहेर मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाले, 'भाजप हा रडीचा डाव खेळत आहे. मी आज जे काही आमदार पद भूषवित आहे. ते स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळेच भूषवित आहे. त्यामुळं शपथ घेताना मी त्यांचे नाव घेतले.' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

'तर, संसदच रिकामी होईल'
एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. मलिक म्हणाले, 'अशा पद्धतीने शपथ घेण्याची प्रथा भाजपनेच सुरू केली आहे. त्यांना आक्षेप असेल, एक आचारसंहिता तयार करायची असेल तर, याविषयावर सर्व पक्षांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे. जर, अशा पद्धतीच्या शपथविधीवर आक्षेप असल तर, संसदेचं संपूर्ण सभागृहच रिकामं होईल. याचा विचार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे का? चंद्रकांत पाटील  यांनी आपल्या पक्षातील या प्रकारावर आधी लक्ष द्यावे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath shinde answered on Chandrakant Patil s challenge