शिवाजी महाराजांविषयी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर शिंदेंनी बोलणं टाळलं; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde and Bhgat Sinh Koshyari

शिवाजी महाराजांविषयी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर शिंदेंनी बोलणं टाळलं; म्हणाले...

मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने करायला लावणाऱ्यांमागे कोणाचा मेंदू आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली. मात्र त्यांनी शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यावर बोलणं टाळलं. Eknath Shinde news in Marathi

हेही वाचा: काळ्या टोपीच्या सडक्या मेंदूमागे कोण? याचा शोध घ्यावा लागेल; ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार काम करत आहे. शिवाजी महाराजांच्या अपमानावरून शिंदे गटाने सरकारमधून बाहेर पडावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावर शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कोणाला आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. मात्र वादग्रस्त टीका करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविषयी बोलणं शिंदे यांनी टाळलं.

हेही वाचा: Uddhav Thackeray Vs Karnataka CM : "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे पुढं म्हणाले, सत्तेच्या खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार मोडले, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन काम करत आहोत. आम्ही जे काम करतो ते उघड करतो. आम्हाला आत्मविश्वास होता म्हणून माझ्यासोबत ५० आमदार आणि १२ खासदार आल्याचं शिंदे यांनी म्हटलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....