2G to 5G Journey : 27 वर्षांपूर्वीचे 2G ते 5G, असा वाढला भारताचा स्पीड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतून 5G इंटरनेट सेवा लाँच केली.
2G to 5G Journey
2G to 5G Journey Sakal

2G to 5G Internet Journey : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतून 5G इंटरनेट सेवा लाँच केली. गेल्या अनेक दिवसांपासून 5G सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा होती. ही सेवा लाँच होण्यापूर्वीपासून अनेक मोबाईल फोन निर्मात्यांनी 5G स्मार्टफोन बाजारात आणण्यास सुरुवात केली होती. आज लाँच करण्यात आलेली 5G सेवा सध्या देशातील निवडक मोठ्या शहरांमध्ये वापरता येणार असून, यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, लखनौ, गुरुग्राम, चंदीगड, अहमदाबाद, गांधीनगर, जामनगर, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. आज आपण भारतातील 2G ते 5G इंटरनेटचा प्रवास कसा होता याबाबत जाणून घेणार आहोत.

2G to 5G Journey
Pune : चांदणी चौकातील पूल आज कोसळणार; तत्पूर्वी पुणेकरांसाठी सूचनांचा महापूर

2G ते 5G चा असा होता प्रवास

भारतात इंटरनेट क्रांतीची सुरुवात 1995 मध्ये 2G सेवा सुरू झाल्यापासून झाली. देशाला 2G ते 3G पर्यंतचा प्रवास करण्यासाठी 14 वर्षे लागली. 3G सेवा 2009 मध्ये सुरू झाली. यानंतर 2012 मध्ये 4G सेवा सुरू झाली आणि आता 2022 मध्ये 5G सेवा लाँच करण्यात आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये 5G सेवा आधीच सुरू आहे. भारताला 2G वरून 5G आणि 4G वरून 5G वर जाण्यासाठी तब्बल 27 वर्षे लागली. या सर्वामध्ये भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची वेगाने वाढणारी संख्या पाहता इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून आज लाँच झालेल्या 5G कडे बघितले जात आहे.

2G to 5G Journey
5G launch updates : स्वस्त की महाग? ५ जीचा तुम्हाआम्हाला काय फायदा?

डिजिटल इंडिया मोहीम

स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पीएम मोदींनी 5G सेवेच्या विस्ताराचाही उल्लेख केला होता. पीएम मोदी दीर्घकाळापासून देशात डिजिटल क्रांतीचा प्रचार करत असून, त्यासाठी डिजिटल इंडिया मोहीम राबवली जात आहे. डिजिटल इंडिया मोहीम यशस्वी करण्यात इंटरनेट सेवेचे योगदान महत्त्वाचे असून, डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत देशातील ग्रामीण भागही इंटरनेटशी जोडला जात आहे. ज्यामुळे ई-गव्हर्नन्स योजना राबवण्यास मदत होत आहे.

5G टेलिकॉम स्पेक्ट्रमचा अर्धा हिस्सा Jio कडे

अलीकडेच, भारतात 5G टेलिकॉम स्पेक्ट्रमचा लिलाव झाला. ज्यामध्ये 1.5 लाख कोटी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या होत्या. यात मुकेश अंबानींच्या जिओने 88,078 कोटी रुपयांच्या बोलीने विकल्या गेलेल्या जवळपास अर्ध्याहून अधिक एअरवेव्हज विकत घेतल्या आहेत. 2030 पर्यंत 5G देशातील एकूण कनेक्शनपैकी एक तृतीयांश पेक्षा अधिक असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर, 2G आणि 3G चा वाटा 10 टक्क्यांपेक्षा कमी असू शकतो असे सांगितले जात आहे.

2G to 5G Journey
5G Launch : तुम्हाला 5G साठी मोजावे लागणार एवढे पैसे

2025 पर्यंत इतके कुटुंबं वापरणार स्मार्ट डिव्हाइस

एका अभ्यासात असा निष्कर्ष काढला गेला आहे की, 2025 पर्यंत सुमारे 87 टक्के भारतीय कुटुंबांकडे इंटरनेट कनेक्शन असेल. 2025 पर्यंत निम्म्याहून अधिक ऑनलाइन खरेदीदार देखील सोशल प्लॅटफॉर्मवरून उत्पादने खरेदी करतील आणि अर्ध्या शहरी कुटुंबांकडे स्मार्टफोन व्यतिरिक्त किमान एक स्मार्ट डिव्हाइस असेल. अभ्यासात असेही सांगण्यात आले की, भारतातील आतापर्यंत 18 दशलक्ष आणि 80 दशलक्ष शहरी कुटुंबे स्मार्ट टीव्ही, स्मार्ट सेट-टॉप बॉक्स आणि इतर स्मार्ट उपकरणांचा वापर करत आहेत. 2025 पर्यंत अशा कुटुंबांची संख्या 50 दशलक्षपर्यंत वाढेल असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com