
शपथविधीनंतर भाजपा आमदार नाराज; समजूत काढण्यासाठी आज बैठक
राज्यातल्या राजकारणातल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी राज्यात नवं सरकार स्थापन झालं. शिवसेनेतून बंड करत वेगळे झालेले एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र हा निर्णय भाजपा आमदारांना रुचलेला दिसत नाही. (Eknath Shinde Devendra Fadnavis Oath taking Ceremony)
हेही वाचा: देवेंद्र फडणवीस ‘उपमुख्यमंत्री’ हा भाजपाचा गेमप्लॅन की आणखी काही?
आज संध्याकाळी पाच वाजता भाजपाच्या सर्व आमदारांची ताज हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री न झाल्याने भाजप आमदार नाराज झाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती मात्र चित्र वेगळंच दिसलं. यामुळे या आमदारांची समजूत काढण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, बावनकुळे असे भाजपाचे ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित असतील.
हेही वाचा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेणार : नड्डा
कालचा दिवस अनपेक्षित घडामोडींनी भरलेला होता. गोव्यातून मुंबईत येत एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) फडणवीसांचा हात धरून सत्तास्थापनेचा दावा केला. तो स्विकारला गेला आणि मग दोघांनी मिळून पत्रकार परिषदेत घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे सगळ्या राज्याने जवळपास गृहित धरलं होतं. पण मोठा ट्विस्ट आला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार अशी घोषणा झाली. देवेंद्र फडणवीस बाहेरून पाठिंबा देणार हेही ठरलं.
हेही वाचा: शपथविधी होताच शिंदे-फडणवीस लागले कामाला; पहिली कॅबिनेट संपन्न
आता शपथविधीला अवघी काही मिनिटं शिल्लक असतानाच थेट दिल्लीतल्या भाजपाच्या हायकमांडकडून सूचना आल्या की देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र शपथविधीवेळी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपत नव्हती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीसुद्धा ही गोष्ट बोलून दाखवली.
Web Title: Eknath Shinde Devendra Fadnavis Bjp Mla Mumbai Meeting Maharashtra Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..