

Eknath Shinde Helicopter
Esakal
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरात दौऱ्यावर असून त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. वडनगरहून अहमदाबादला जाण्याआधी हेलिकॉप्टरमधील बिघाड समोर आला. त्यावेळी हेलिकॉप्टरने जाणं रद्द करून उपमुख्यमंत्री शिंदे हे रस्ते मार्गे गाडीने अहमदाबादला नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.