
Maharashtra Politics: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी आहेत. राज्यात पालकमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी उघड नाराजीही व्यक्त केलीय. तर एकनाथ शिंदे यांनीही पालकमंत्रिपदाची अपेक्षा असण्यात गैर काही नसल्याचं म्हटलं होतं. यातच ते थेट गावी गेल्यानं पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे.