
एकनाथ शिंदे गुजरातमध्ये ! देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री घेतली भेट
गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे दोघे शुक्रवारी मध्यरात्री गुजरातमधील बडोदा येथे भेटले. या प्रसंगी महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सुद्धा बडोद्यात उपस्थित होते. शिंदे हे गुवाहाटीहून शुक्रवारी रात्री विशेष विमानाने बडोद्यात आले होते, अशी सूत्रांनी माहिती दिली. फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहाटीला परतले. (Eknath Shinde Meet With BJP Leaders In Gujarat)
हेही वाचा: शिंदे गटाचे नरेश म्हस्के आक्रमक, शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा
येथे त्यांच्या बरोबर जवळपास ४० शिवसेना बंडखोर आमदार पंचतारांकित हाॅटेलमध्ये थांबले आहेत. यातील १६ आमदारांना यात शिंदेही आहेत, त्यांना अपात्रतेची नोटीस महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाठवली आहे. या नोटीसीला सोमवारी उत्तर देण्याचे झिरवळ यांनी सांगितले आहे आणि त्यासाठी मुंबईत त्यांना यावे लागेल. (Maharashtra Politics)
हेही वाचा: 'महाराष्ट्रात बेरोजगारी आणि महागाई, काहींना केवळ सत्तेत येण्याची चिंता'
शिंदे आणि बंडखोरांची इच्छा आहे, की त्यांचा एकेकाळचा सहकारी भाजप बरोबर पुन्हा एकदा सरकार स्थापन करावे. बंडखोरांनी यापूर्वीच आपल्या गटाला 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असे नाव दिल्याची घोषणी केली आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसने सांगितले आहे, की बंडखोरांनी परतून विश्वास दर्शक ठरावाला समोरे जावे.
Web Title: Eknath Shinde Meet With Bjp Leaders In Gujarat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..