शिवसेनेचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदेनंतर आणखी तीन मंत्री नॉट रिचेबल

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे
शिवसेनेचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदेनंतर आणखी तीन मंत्री नॉट रिचेबल
Updated on
Summary

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला आहे. यात भाजपाने मुंसडी मारली आहे. राज्यसभेतील यशानंतर पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, या निकालानंतर आता महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कालपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. या बातमीनंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचे टेन्शन अजुन वाढले आहे.

शिवसेनेचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदेनंतर आणखी तीन मंत्री नॉट रिचेबल
मागच्या वेळी प्रसाद लाड यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे 9 आमदार फोडले होते...

एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. म्हाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या तिन्ही नेत्यांचे फोन बंद आहेत. तिघांचेही फोन लागत नसल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे सेनेच्या समोर आता पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, राज्यसभेत भाजपा १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र नाराज असलेले शिवसेना नेते आजच्या बैठकीला उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

शिवसेनेचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदेनंतर आणखी तीन मंत्री नॉट रिचेबल
मोठी बातमी! धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Farmer Earns Premium Price as Sugarcane Fetches ₹5,000 Per Tonne
solapur city
The Pune Municipal Corporation has approved medical assistance for the families of former corporators under its contributory healthcare scheme.
Students Get Financial Boost as Monthly Hostel Meal Grant Raised to ₹3,200
Marathi News Esakal
www.esakal.com