Eknath Shinde and Amit Shah political meeting in New Delhi
esakal
देशात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तार, शिवसेनेचे वाढलेले राजकीय वजन आणि नव्याने पक्षात दाखल झालेल्या खासदारांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे विशेष लक्ष लागले होते. मात्र, या सर्व चर्चांवर आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.