

eknath shinde
esakal
Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या 'ऑपरेशन टायगर'ला ठाकरे गटाचे नेते 'ऑपरेशन फडणवीस' म्हणून हिणवत आहेत. देवेंद्र फडणवीसांना खाली खेचण्याचं काम एकनाथ शिंदेंकडून सुरु असल्याचा सूर ठाकरेंच्या नेत्यांचा आहे. फडणवीसांना पंतप्रधानपद मिळू नये, म्हणून शिंदे कारस्थान रचत असल्याचा आरोप ठाकरे करत आहेत.