उद्धव ठाकरेंच्या 'कटप्पा' टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले तो तुमच्यासारखा...

eknath shinde on uddhav thackeray
eknath shinde on uddhav thackeraySakal

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंड करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्यात आज पहिल्यांदाच थेट शाब्दिक सामना रंगला होता. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर गद्दारीची टीका करण्यात येत आहे. त्यातच आज उद्धव यांनी एकनाथ शिंदेंना थेट कपप्पा संबोधलं. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

eknath shinde on uddhav thackeray
Dasara Melava: "होय मी कंत्राटी मुख्यमंत्री..."; CM शिंदेंनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर

एकनाथ शिंदे म्हणाले की, मला कटप्पा म्हणाले. कटप्पा स्वाभिमानी होता. प्रामाणिकहोता. तुमच्या सारखा दुटप्पी राजकारणी नव्हता, असंही शिंदे यांनी म्हटलं. आम्ही कधीही कोणाला त्रास देणार नाहीत. आम्ही समोरून वार करणारे आहोत. तुम्ही आमच्या शिवसैनिकांवर मोक्का लागले, असंही शिंदे म्हणाले.

शिंदे पुढं म्हणाले की, मराठा समाजाच्या मोर्चाला पण तुम्ही मुका मोर्चा म्हणालात.. पण या राज्यात कुणारवही अन्याय करणार नाही... मी घाबरत नाही.. लोकांसाठी मी काहीही भोगू शकतो... लोकांना न्याय दिल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही.

eknath shinde on uddhav thackeray
Dasara Melava : आम्ही गद्दारी नाही 'गदर' केलाय; CM एकनाथ शिंदेंची 'सनी स्टाईल'

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मी दवाखान्यात असताना दगा केला. माझ्या हाताची हालचाल होत नव्हती. अशावेळी कटप्पा बनून माझ्या पाठित खंजीर खुपसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com