Eknath Shinde: जालन्यात शिंदेसेनेला मोठं भगदाड! सर्व तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, कार्यपद्धीवर नाराज

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे. मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील सर्व तालुकाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.
Major Setback for Shinde Sena In Jalna

Major Setback for Shinde Sena In Jalna

ESakal

Updated on: 

जालना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जालना जिल्हा दौऱ्याआधीच शिवसेना पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असल्याची माहिती समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील सर्व तालुकाप्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. यामुळे शिंदेसेनेला मोठं भगदाड पडलं असून राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...