
मुंबई : राज्यात सरकार स्थापनेचा गोंधळ सुरु असतानाच अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या गावी गेले आहेत. यावरुन बऱ्याच राजकीय झडत आहेत. त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या या दौऱ्यावर शंका उपस्थित केली आहे. एकनाथ शिंदे हे आमावास्येच्या मुहूर्तावर गावाला गेलेत, असं त्यांनी म्हटलं आहे.