
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा काय घोळ सुरुए अद्याप स्पष्टपणे समोर आलेलं नाही. पण भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित असलं तरी आधी चेहरा जाहीर करा नंतरच पुढची चर्चा होईल, असा पवित्रा महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे. गुरुवारी दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत ही चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे.